दुधाच्या टँकरला पोलिसांचं संरक्षण

मुंबईत दूध पुरवठा करणारे टँकर वाशी टोल नाका, मुलुंड टोल नाका आणि दहिसर टोल नाका इथून मुंबईत येतात. हे टँकर आंदोलकांनी अडवू नयेत, याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये. यासाठी पहाटेपासूनच पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे.

  • दुधाच्या टँकरला पोलिसांचं संरक्षण
SHARE

दूधकोंडी आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना मुंबईतील रहिवाशांना दूधपुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून राज्य सरकार बाहेरच्या राज्यातूनही दूध मागवत आहे. हे दुधाचे टँकर विनाअडथळा मुंबईत यावेत म्हणून या टँकरना पोलिस संरक्षण देण्यात येत आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर देखील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


'या' नाक्यावर पोलिस बंदोबस्त

मुंबईत दूध पुरवठा करणारे टँकर वाशी टोल नाका, मुलुंड टोल नाका आणि दहिसर टोल नाका इथून मुंबईत येतात. हे टँकर आंदोलकांनी अडवू नयेत, याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये. यासाठी पहाटेपासूनच पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे.


सुरक्षेची जबाबदारी

एवढंच नव्हे, तर शहरात प्रवेश केल्यानंतर टँकर ज्या ज्या भागातून जाणार आहे. त्या भागातील संबधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांना टँकरच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय मिल स्पेशल आणि दुचाकीद्वारे संबधित गाडींसोबत पोलिस सोबत आहेत.'या' ठिकाणी नाकाबंदी

पश्चिम द्रूतगती मार्ग, पूर्व द्रूतगती मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावर पोलिसांनी ठिकठिकाणी सकाळी नाकाबंदी ठेवण्यात आली होती. ज्या भागातून टँकर जात होता. त्या टँकरसोबत पोलिसांचं पथक किंवा पोलिस कर्मचारी सोबत जात होते. त्यामुळे मुंबईत तरी दुधाच्या गाड्या अडवण्यासारखा प्रकार घडलेला नाही.


शहरात दाखल होणाऱ्या दुधाच्या प्रत्येक टँकरला पोलिसांनी संरक्षण पुरवलं आहे. पोलिसांकडून आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येत असून शहरात योग्य पद्धतीने दूध पुरवठा होत आहे. गाड्या अडवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- दीपक देवराज, प्रवक्ते, मुंबई पोलिस उपायुक्तहेही वाचा-

मुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर

मुंबईकरांनो, आज जरा जास्तीचंच दूध खरेदी करा...संबंधित विषय
ताज्या बातम्या