१५० लठ्ठ पोलिसांचं महिन्यात ५ किलो वजन घटलं

पोलिसांचं वाढलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांनी स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस’ या शिबिराचं आयोजन केलं. ६ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या या शिबिरात पोट वाढलेल्या १५० पोलिस कर्मचाऱ्यांना नायगाव मुख्यालयात मार्गदर्शन देण्यात आले. महिनाभर योगा, व्यायाम आणि इतर खेळाच्या माध्यमातून पोलिस कर्मचारी तंदुरूस्त कसं राहता येईल, याचं मार्गदर्शन शिबिरात देण्यात आलं.

SHARE

मुंबई पोलिस दलातील कर्मचारी हे स्वस्थ आणि सशक्त राहण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांनी सुरू केलेले विशेष मार्गदर्शन शिबिर मंगळवारी संपलं. या शिबिरात सहभागी झालेल्या १५० लठ्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचं एका महिन्यात ५ किलोनं वजन घटल्याचं सांगण्यात आलं आहे. महिनाभर योगा, व्यायाम आणि इतर खेळाच्या माध्यमातून पोलिस कर्मचारी तंदुरूस्त कसं राहता येईल, याचं मार्गदर्शन या शिबिरात पोलिसांना देण्यात आलं. या मार्गदर्शन शिबिराचा दुसरा टप्पा हा मार्चपासून सुरू होणार आहे


उपक्रम यशस्वी

ड्युटीची अनिश्चित वेळ, वेळी-अवेळी आणि बाहेरचे ‘खाणे’ यामुळे मुंबई पोलिसांची वाढलेली पोटे हा कधी थट्टेचा तर कधी चिंतेचा विषय म्हणून चर्चिला जातो. हृदयव‌किार, उच्च रक्तदाब यांसारख्या कुरबुरींनी वेढलेल्या पोलिसांच्या पोटाची मात्र आरोग्यस्थिती समोर येत नव्हती. मात्र वाढलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांनी स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस’ या शिबिराचं आयोजन केलं. ६ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या या शिबिरात पोट वाढलेल्या १५० पोलिस कर्मचाऱ्यांना नायगाव मुख्यालयात मार्गदर्शन देण्यात आले.  या मार्गदर्शन शिबिरात पोलिसांच्या जीवनशैलीमुळे कुठले पोटाचे विकार होऊ शकतात आणि त्याच्या प्रतिबंधासाठी काय करावं? याबाबतही पोलिसांना व्यायाम शिकवला गेला. याचा परिणाम १ महिन्यानंतर पोलिसांना जाणवला.


ऋतुजा दिवेकर यांचं मार्गदर्शन

योग्यवेळी आहार, योग्य पद्धतीनं व्यायाम आणि योगा केल्यामुळे या शिबिरात सहभागी झालेल्या १५० कर्मचाऱ्यांपैकी काहींचं वजन एका महिन्यात ५ किलोनं तर काहींचं ९ किलोनं कमी झाल्याचं आरोग्य तपासणीतून पुढे आलं. योगा, व्यायाम आणि प्रसिद्ध आहारतज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांना आहाराचे पथ्य कसं करावं याचंही पोलिसांना मार्गदर्शन दिलं आहे. दुसऱ्या तुकडीतही १५० पोलिस सहभागी असून दिवसभर त्यांना हेच प्रशिक्षण नायगाव मुख्यालयात देण्यात येणार आहेहेही वाचा -

लाच घेणाऱ्या पोलिसांवर थेट ‘बडतर्फ’ची कारवाई
संबंधित विषय
ताज्या बातम्या