Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात


मुंबईत मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात
SHARES

मुंबईसह अजुबाजूच्या परिसरात मंगळवारी सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जोराच्या वाऱ्यासह पावसानं बरसण्यास सुरुवात केली आहे. मागील ३ दिवस सलग कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं होतं.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसानं मुंबईत लावलेल्या हजेरीमुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या पावसाचा जोर अधिकच वाढला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन असल्याने तसंच, वाहतुकीला अद्याप परवानगी नसल्यामुळे या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नाही. परंतु, घराबाहेर काही कामासाठी पडलेल्या चाकरमान्यांना पाणी साचल्याने मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.

मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये तब्बल ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटर (एमएलडी) म्हणजे ५१६८ कोटी लिटर पाण्याची वाढ झाली आहे. 

मुंबईला दररोज सरासरी ३८५० एमएलडी (३८५ कोटी लिटर) पाणीपुरवठा केला जातो. ही बाब लक्षात घेता दोन दिवसांत सुमारे १३ दिवसांच्या पाणीसाठ्याची पडली आहे. हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णयRead this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा