Advertisement

मुंबईत मुसळधार पावसामुळं पाणी साचण्याची शक्यता


मुंबईत मुसळधार पावसामुळं पाणी साचण्याची शक्यता
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवारी पावसानं तुफान हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत ढघाळ वातावरण होतं. सोमवारी दुपारी पावसानं जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसामुळं मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईकरांवरील पाणीटंचाईचं संकट दुर होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून मुंबईत पावसानं तुफान बॅटींग करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातील पडलेल्या पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत प्रचंड पाणी साचलं. चाळीत, इमारतीत पाणी शिरल्यानं अनेकांचं  मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, मुंबईत सोमवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

जुलैच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले. मात्र तोपर्यंत तलावांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने ५ ऑगस्टपासून मुंबईत वीस टक्के पाणी कपात लागू केली आहे. परंतु, आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.  



हेही वाचा -

मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा