मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्यस्थितीत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असून, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
अत्यंत महत्वाचे Very IMP
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 14, 2020
With latest Satellite/Radar observations, Entire North Konkan is updated to Orange Alert with Raigad Red Alert & 15 Oct entire North Konkan is on Red Alert including Mumbai Thane.
Very severe convection is being observed.Take max precaution
RMC Mumbai pic.twitter.com/jA39ur876n
मुंबईच्या दादर, परळ, लालबाग, माटुंगा, अंधेरी, सायन, कुर्ला, मालाड, बोरिवली यांसह अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याशिवाय, राज्यात अनेक भागांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर आहे.
मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसंच, यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता तसेच ही परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती.