Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा
SHARES

मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. बुधवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळं मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. शिवाय, समुद्रातही भरती येणार असल्यानं या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या २४ वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर इथं ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा इथं कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसंच सांताक्रूझ इथं कमाल तापमान ३१.१ आणि किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पुढील २ दिवस रायगड, रत्नागिरी इथं तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

तलाव पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये

  • मोडकसागर - ६६,०९२
  • तानसा - ७८,४६७
  • मध्य वैतरणा - ३७,५५१
  • भातसा - १,९७,३२१
  • तुळशी - ८,०४६
  • विहार - २७,६९८
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा