Advertisement

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी; चाकरमान्यांचे हाल

बुधवारी सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी; चाकरमान्यांचे हाल
SHARES

बुधवारी सकाळपासूनच पावसानं (mumbai rains) जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह आसपासच्या पावसाने चांगली बॅटिंग केली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

सकाळपासून मुंबईत धुँवाधार पावसाने सुरुवात केली. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान मुंबईतील अनेक परिसर हे जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

मुंबईत गेल्या ८ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणात ९ जून ते १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल होता. मुंबईतील पाऊस शुक्रवारपासून काहीसा कमी झाला आहे. मात्र मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert देण्यात आला असून, १७ जूनपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात  आला आहे.



हेही वाचा -

कोकणात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा