Advertisement

मुसळधार पावसाने घेतला महापालिका कर्मचाऱ्यांसह चौघांचा बळी

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने महापालिकेच्या २ कामगारांसह ४ जणांचा बळी घेतला आहे. यांत कुर्ला आणि दादर येथील दोघांचा समावेश आहे.

मुसळधार पावसाने घेतला महापालिका कर्मचाऱ्यांसह चौघांचा बळी
SHARES

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने महापालिकेच्या २ कामगारांसह ४ जणांचा बळी घेतला आहे. यांत कुर्ला आणि दादर येथील दोघांचा समावेश आहे.  

पी/दक्षिण वॉर्डातील महापालिका कर्मचारी विजयेंद्र सरदार बागडी (३६) आणि जगदीश परमार (५४) गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर भागात कार्यरत होते. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चक्कर आल्याने ते पडल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांना त्वरीत जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालय आणि नंतर कापडिया रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूबाबत अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा- मुंबईत ४ दिवसात महिनाभराचा पाऊस, ४८८.७ मिमी पावसाची नोंद

तर बुधवारी सायंकाळी ४.२० वाजता बीकेसीजवळील भारतनगर खाडीत पडून मोहम्मद शाहरुख शाकीब शेख (२४) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचसोबत दादरला हिंदमाता येथील सेंट पॉल शाळेजवळ बुधवारी मध्यरात्री १२.२५ वाजता एक तरंगणारा मृतदेह पोलिसांना आढळून आला. अशोक दत्ताराम मयेकर (६०) अशी या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे.  

बुधवारी सायंकाळी वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन भागातील मिठी नदीत ४ मुलांनी पोहण्याकरीता उड्या मारल्या. यापैकी तीन जण सुखरुप बाहेर आले, मात्र एक जण अजूनही बेपत्ता आहे.हेही वाचा-

गटरात वाहून गेलेल्या ६ वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

गणेश मंडळांनी वीजप्रवाह बंद ठेवावा, समितीचं आवाहनRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा