Advertisement

मुंबईत ४ दिवसात महिनाभराचा पाऊस, ४८८.७ मिमी पावसाची नोंद

मुंबईत मागील ४ दिवसात मुंबईत महिन्याभराचा पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे. १ सप्टेंबरपासून ४ सप्टेंबर या कालावधीत ४८८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत ४ दिवसात महिनाभराचा पाऊस, ४८८.७ मिमी पावसाची नोंद
SHARES

यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला मुसळधार पावसानं मुंबईत जोरदार हजेरी लावली असून, मागील ४ दिवसात मुंबईत महिन्याभराचा पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी ३२७.१ मिमी पाऊस पडतो. परंतु, यंदासप्टेंबरपासून सप्टेंबर या कालावधीत ४८८.७ मिमी पावसाची नोंद सांताक्रुझ वेधशाळेनं केली आहे. दरम्यान, १९६० ते २०१० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात मुंबईत सरासरी ३२७.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद सांताक्रुझ वेधशाळेनं म्हटलं आहे. तर  याच कालावधीत सरासरी ३०४.६ मिमी पाऊस पडला असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे

७३.१ मिमी पाऊस 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सरासरी ७३.१ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा १ सप्टेंबरला सुरू झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरात कोकण यांसारख्या विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावली.  त्यामुळं मुंबईतील अनेक भागांत पाणी साठल्यानं रस्ते वाहतुकीला फटका बसला होता. तसंच, अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणं ठप्प झाली होती.

पावसाची नोंद

दरम्यान, सर्वाधिक पाऊस सप्टेंबर २०१८ रोजी १५.६ मिमी इतका पडला होता. याआधी सप्टेंबर १९५४ मध्ये सर्वाधिक पाऊस पडला होता. त्यावेळी मुंबईत ९२० मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर २० सप्टेंबर २०१७ रोजी ३०३.७ मिमी पडला होता. तसंच, २३ सप्टेंबर १९८१ रोजी ३१८.२ मिमी पाऊस पडला होता.



हेही वाचा -

आरेमधील वृक्षतोडीला राज ठाकरे आणि लता मंगेशकर याचा विरोध

मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा