Advertisement

मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता गुरूवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
SHARES

मुंबईसह ठाणे आणि कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. सखल भागांत पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक बंद असल्यानं प्रवाशांना आहे त्याच ठिकाणी रात्र काढावी लागली. तसंच, शाळेतून विद्यार्थ्यांना घरी लवकर सोडण्यात आलं. दरम्यान, हवामान विभागान मुंबई, ठाणे, कोकणात हवामान खात्याकडून रेड अॅलर्ट जारी केल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता गुरूवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

शाळांना सुट्टी जाहीर

मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसानं बुधवारी जोर धरला. त्यामुळं महापालिकेनं पालिका शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळं गुरूवारी देखील रेड अलर्ट अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यानं शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.हेही वाचा -

तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक पुर्वपदावरसंबंधित विषय