मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
कोकणातील सर्व शाळांना
नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी हा आदेश दिलाय. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय.
तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजना सुट्टी देण्यात आलीय.