Advertisement

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी


मुंबईत पावसाची जोरदार हजेरी
SHARES

मुंबईत मागील आठवड्याच्या शुक्रवार ते सोमवार पडलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली. परंतु, रविवारी सकाळपासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन पावसाच्या खेळात मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत होता. परंतु, रविवारी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत रविवारी पडलेल्या पावसामुळे थंडगार वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईच्या दादर, लालबाग, माटुंगा, सायन, कुर्ला, परळ, अंधेरी या परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. 

मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचलं होतं. त्यामुळं महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांवर टीका करण्यात आली होती. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा