Advertisement

मुंबईत मान्सून दाखल; अद्याप पावसाची हजेरी नाही


मुंबईत मान्सून दाखल; अद्याप पावसाची हजेरी नाही
SHARES

शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मान्सूननं मुंबईत हदेरी लावली. भारतीय हवामान विभागानं रविवारी अपेक्षेप्रमाणे मुंबईत मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने आता व्यापला आहे. मान्सूनचा कोकणातील प्रवास गेले तीन दिवस रेंगाळला होता. ११ जूनला राज्यात मान्सून आगमन झाले. त्यानंतर मुंबई वगळता राज्यात मान्सूनने पार विदर्भापर्यंत मजल गाठली होती. त्यामुळं मुंबईकरांना मान्सूनत कधी येणार याची प्रतीक्षा होती.

शनिवारी दुपारनंतर डोंबिवली, नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मात्र काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. रविवारी अधूनमधून आकाश ढगाळ होते. मात्र दिवसभरात कुलाबा आणि सांताक्रूझ इथं संध्याकाळी ५.३० पर्यंत पावसाची नोंद अजिबात झालेली नाही.

प्रादेशिक हवामान विभागानं मुंबईसाठी सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे तुरळक आणि काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह पालघरमध्ये गुरुवारपर्यंत तर ठाण्यात बुधवारपर्यंत तुरळक ते काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



हेही वाचा -

मुंबईची लाइफलाइन पून्हा सुरू

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा