Advertisement

Heavy rain in state राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता


Heavy rain in state राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
SHARES

जुन महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं मुंबईसह राज्यभरात जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच जोरदार हजेरी लावली. त्यामुळं सर्वत्र थंडगार वातावरण असून, पावसाची संततधारा सुरूच आहे. अशातच आता पुढचे २ दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मुंबईत सोमवारी सकाळी पावसाला सुरूवात झाली. तसंच, आता मंगळवारी आणि बुधवारी संपुर्ण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणासाठी यलो  आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हयांत जोरदार पाऊस पडेल. गुरुवारी संपुर्ण कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढRead this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा