Advertisement

Mumbai Rains : मुसळधार पावसासोबत मुंबईकरांवरील दुर्घटनांची मालिका संपेना

ठाणे, पालघर, रायगड, मुंबईसह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

Mumbai Rains : मुसळधार पावसासोबत मुंबईकरांवरील दुर्घटनांची मालिका संपेना
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना, शहरात एका हायस्कूलची भिंत कोसळण्यासह विविध दुर्घटना घडल्या. सुदैवाने कोणत्याही घटनेत नागरिक जखमी झाले नाहीत.

ठाणे, पालघर, रायगड, मुंबईसह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रायगडच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर आता नालासोपाऱ्यात एक चार मजली इमारत कलंडली (झुकली) आहे.

विशेष म्हणजे या इमारतीत तब्बल 16 कुटुंब वास्तव्यास होते. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली.

संबंधित घटना ही नालासोपारा पश्चिम हनुमान नगर परिसरात घडली. हनुमान नगरच्या समर्थ नगर येथील जैनम अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कलंडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

प्रथम, सोमवारी रात्री उशिरा गोरेगाव पूर्व येथील आयटी पार्कजवळील रस्त्याचा काही भाग खचला. घटनेची माहिती मिळताच मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नुकसानीची तपासणी करणार आहे.

दुसऱ्या घटनेत मंगळवारी सकाळी 6.45 च्या सुमारास जोगेश्वरीतील मेघवाडी येथील मणीभाई चाळीजवळील लोक कल्याण शाळेच्या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भिंत कोसळली. 

जवळच्या डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड खाली आले, ज्यामुळे जवळच्या बहुमजली इमारतीच्या मागील भागावर परिणाम झाला.

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरातील रामबाग सोसायटीजवळ दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. पहाटे दोनच्या सुमारास रामबाग सोसायटीच्या शेजारील टेकडीचा मोठा भाग सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर पडला. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मंगळवारी दुपारी 3.15 वाजता हजारीमल सोमाणी मार्गावरील आझाद मैदानाजवळील रॉयल चायना रेस्टॉरंटसमोरील इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसवर एक मोठे झाड पडले. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाची बस क्रमांक १०४०७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात असताना तिच्या छतावर झाड पडले. बसचे नुकसान झाले, तर प्रवासी सुखरूप बचावले.

IMD ने मंगळवारी रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी बुधवारी रेड अलर्ट तर मुंबई, पालघर आणि ठाणेसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान खात्याने पुढील २४ तासांत "मध्यम ते मुसळधार पाऊस" होण्याची शक्यता वर्तवली आहे.



हेही वाचा

पर्यटकांनो लक्ष द्या, माथेरानच्या मालडुंगा पॉईंटवर लँडस्लाईड

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा