Advertisement

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट

रत्नागिरीसाठी रेड अलर्ट

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट
SHARES

हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवार 27 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने तीन दिवसांसाठी हा अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या देखील निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने 27 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात 'रेड' अलर्ट जारी केला. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार, तानसा जलाशय ओव्हरफ्लो झाले आहेत. यापूर्वी तुळशीचा जलाशय ओसंडून वाहत आहे. मुंबई महानगर प्रदेशाला पाणीपुरवठा करणार्‍या 7 जलाशयांपैकी इतर 4 जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी विहार, तानसा आणि तुळशी तलाव आत्तापर्यंत ओव्हरफ्लो झाले आहेत.



हेही वाचा

मुंबईत लागू झालेली 10 टक्के पाणीकपात पालिका रद्द करणार?

मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही ओव्हरफ्लो

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा