Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

रेल्वे मार्गाच्या स्वच्छतेसाठी धावतोय मध्य रेल्वेचा 'स्वच्छता रथ'

पावसाळ्यात रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेचा 'स्वछता रथ' धावत आहे.

रेल्वे मार्गाच्या स्वच्छतेसाठी धावतोय मध्य रेल्वेचा 'स्वच्छता रथ'
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे परिसरात जास्तीचा पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात साचतं. त्यामुळं रेल्वे मार्गावर घाणीचं साम्राज्य निर्माण होतं. घाणीमुळं रेल्वे परिसर अस्वच्छ बनतो आणि यामुळं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळं यंदा रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यात रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेचा 'स्वछता रथ' धावत आहे.

रेल्वे स्थानक आणि रेल्वे रेल्वे रुळांलगतच्या भागाची स्वच्छता  करण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्यानं विविध उपाययोजना करते. रेल्वे रूळ स्वच्छ ठेवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान कचरा काढण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी 'स्वच्छता रथ' धावत आहे.

लॉकडाऊन काळात हा रथ दिवसाही चालविण्यात आला. घाण आणि कचरा साफ केल्यावर गोणींत भरले जाते. त्यानंतर 'स्वच्छता रथ' स्पेशल ट्रेनमध्ये या गोणी भरल्या जातात. मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रत्येकी एक याप्रमाणे मध्य रेल्वे प्रशासन दोन ईएमयू 'स्वच्छता रथ' गाड्या चालवत आहे. आवश्यकता असल्यास जेसीबी मशीनच्या सहाय्यानं घाण, कचरा काढला जातो. तेव्हा, ३ बीआरएन (फ्लॅट प्रकारचे वॅगन) चालविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

सीएसएमटी ते कल्याण या रेल्वे मार्गादरम्यान पारसिक बोगद्याजवळील दोन्ही बाजूंच्या झोपडपट्ट्या, डोंबिवली स्थानकाच्या धीम्या मार्गाजवळील भाग, विक्रोळी, माटुंगा- शीव दरम्यान धोबी घाट व धारावी, सीएसएमटी- मस्जिद-सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान 'स्वच्छता रथ'  मुख्यतः वापरलं जातं. तर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान वडाळा आणि किंग्ज सर्कल, माहीम, चेंबूर आणि मानखुर्द दरम्यान जीटीबी नगर आणि रावली जंक्शन येथेही स्वच्छता रथ' वापरले जाते. रेल्वे रुळांवर कचरा टाकू नये, असे नागरिकांना मध्य रेल्वे प्रशासनानं आवाहन केलं आहे.हेही वाचा -

Dahi Handi Festival: यंदा थर लागणार नाहीत, दहीहंडीवर करोनाचं सावट

लोकलमधून सुमारे ४.२४ लाख प्रवाशांचा प्रवाससंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा