Advertisement

लोकलमधून सुमारे ४.२४ लाख प्रवाशांचा प्रवास

मागील एका आठवड्यात एकूण ४ लाख २४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

लोकलमधून सुमारे ४.२४ लाख प्रवाशांचा प्रवास
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ महिने बंद असलेली लोकल पुन्हा सुरू करण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं आपल्या मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू केली. ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठच असून अद्याप सामान्यांना प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. ही लोकल सुरू होऊन एक आठवडा उलटला असून, मागील एका आठवड्यात एकूण ४ लाख २४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

तब्बल ४ लाखाहून अधिक प्रवाशांनी रेल्वेनं प्रवास केला असून, यामधून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला सुमारे १ कोटी ७७ लाख रुपयांचे महसूल मिळाला आहे. राज्य सरकारनं निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गवरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून एकूण ३६२ फेऱ्या धावत आहेत. सर्व लोकल या १२ डब्यांच्या लोकल धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर कसारा/कर्जत/कल्याण ते सीएसएमटी दोन्ही दिशेकडे १३० फेऱ्या, हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी दोन्ही दिशेकडे ७०  फेऱ्या धावत आहेत. १५ जून ते २२ जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरून ९३ हजार ८३४ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वे प्रशासनाला १ कोटी २० लाख रुपयांचा महसूल मिळाला. तर, २३ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार ५२७ प्रवाशांनी प्रवास केला.

पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते चर्चगेट दोन्ही दिशेकडे १४६ फेऱ्या आणि विरार ते डहाणू रोड दोन्ही दिशेकडे १६ फेऱ्या धावत आहेत. यातून १५ जून ते २२ जूनपर्यंत  पश्चिम रेल्वे मार्गावरून ३ लाख २१ हजार ८३९ प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वे प्रशासनाला ५२ लाख १३ हजार  रुपयांचा महसूल मिळाला.



हेही वाचा -

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

Salon And Beauty Parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा