Advertisement

मुंबईची तुंबई! कधी होणार सुटका?

मुंबईसह आसपासच्या परिसरात मागील आठवड्यातील शुक्रवारपासून पावसानं हजेरी लावली. सतत पडत असलेल्या पावसामुळं मुंबईचे रस्ते जलमय झाले असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईची तुंबई! कधी होणार सुटका?
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मागील आठवड्यातील शुक्रवारपासून पावसानं हजेरी लावली. सतत पडत असलेल्या पावसामुळं मुंबईचे रस्ते जलमय झाले असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचं पाणी ओसरत नसल्यामं मुंबईची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सकाळी कामासाठी निघालेले अनेक चाकरमानी अजूनही मोठ्या वाहतुककोंडीत अडकले आहेत. पाणी साचल्यानं वाहनंही अडकल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, दरवर्षी पावसात निर्माण होणाऱ्या या परिस्थितीला मुंबईकर कंटाळले असून, त्यांना यातून सुटका कधी मिळणार असा सवाल सतावत आहेत.

मुसळधार पावसाता फटका मुंबईच्या लाइफलाइनलाही बसला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी दुर्घटनांची दरड कोसळली. मुसळधार पावसामुळं मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, अंधेरी या परिसरात वेगवेगळ्या दुर्घनांमध्ये ३३ जणांचा बळी गेला. या दुर्घटनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर झाली आहे.

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍यानं कार्यान्‍व‍ित होत असून मुंबईतील ज्‍या भागांना संध्याकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुरवठा टप्‍प्‍या-टप्‍प्‍यानं सुरु करण्‍यात आला आहे. भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचं पाणी शिरल्यानं जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. या कारणानं मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये रविवारी सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता.

दरम्यान, मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल हे भाग सखल असून या भागांत गुडघाभर पाणी साचतं. त्यामुळं वाहतुककोंडी निर्माण होते. परिमाणी तासंतास चाकरमान्यांना या वाहतुककोंडीत अडकून राहावं लागतं. त्यामुळं मुंबईकरांना होणार हा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेनं भुमिगत टाक्या तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कामालाही सुरूवात केली. परंतु, महापालिकेचा हा प्रकल्प किती? यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा