Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! 28 जून रोजी मुंबईत यलो अलर्ट

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक पुणे आणि साताऱ्यासाठी 'ऑरेंज' अलर्ट

मुंबईकरांनो लक्ष द्या! 28 जून रोजी मुंबईत यलो अलर्ट
SHARES

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी 28 जूनला हवामान खात्याने 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज असून IMD ने शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे 24 तासात 115.5 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडेल. हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र भागांसाठीही अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत सोमवारी अतिरिक्त 47 मिमी पाऊस झाला आणि कमाल तापमान 30.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावले.

कुलाबा वेधशाळेत गेल्या २४ तासांत ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शहरात 95% च्या जवळपास असलेला पाऊस कमी होऊन 42% वर आला आहे.

मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचले असून त्याचा परिणाम वाहतूकीवर होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा