Advertisement

नोव्हेंबर महिन्यात ३०.१ मिमी पावसाची नोंद

यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात ३०.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे.

नोव्हेंबर महिन्यात ३०.१ मिमी पावसाची नोंद
SHARES

यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात ३०.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. याआधी २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक पावसाची (१०९.३ मिमी) नोंद झाली होती.

मिळालेल्याम माहितीनुसार, याआधी नोव्हेंबर महिन्यात ५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेनुसार या नोव्हेंबर महिन्यात ३०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच, या ३०.१ मिमी पावसापैकी सर्वाधिक २४.७ मिमी पावसाची नोंद ही २१-२२ नोव्हेंबरमध्ये झाली आहे.

या आठवड्यात महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच, महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीलगत पुढील ५ दिवस मच्छिमारांना धोक्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून मुंबईत ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मुंबईसह पालघर, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक आणि इतर जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी मुंबईच्या किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली. मंगळवार ३० नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ वेधशाळेनुसार किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस होतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा