मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महागलं

 Mumbai
मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महागलं
Mumbai  -  

देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईची ओळख आता महागडं शहर म्हणून देखील होऊ लागली आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव हे देशात सर्वाधिक आहेत. दारुबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारनं पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोलचा दर 74 रुपये प्रतिलिटरच्या घरात गेला आहे. 

नांदेड पाठोपाठ मुंबईत सर्वाधिक, म्हणजे 77 रुपये 45 पैसे प्रति लिटर दरानं पेट्रोलची विक्री सुरु आहे. तर नागपूरमध्ये 77.14 पैसे प्रति लीटरने पेट्रोल मिळतं. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत मात्र पेट्रोल  68.26 पैसे प्रति लीटर दराने विकलं जातं.

Loading Comments