Advertisement

मुंबईचे रस्ते दोन वर्षात खड्डेमुक्त होणार

मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली,

मुंबईचे रस्ते दोन वर्षात खड्डेमुक्त होणार
फाइल फोटो
SHARES

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 23 मार्च रोजी सांगितले की, मुंबईचे 2,055 किमीचे रस्ते लवकरच खड्डेमुक्त होतील. कारण येत्या दोन वर्षांत त्यांचे काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये रूपांतर केले जाईल.

नवी दिल्ली येथे मनीकंट्रोल पॉलिसी नेक्स्ट - 10 ट्रिलियन इन्फ्रा पुश समिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रयत्न पुढील दोन वर्षात केला जाईल. 

गडकरी म्हणाले, "मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च करत आहोत, या प्रकल्पाचे टेंडर निघाले असून दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल."

गेल्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील ३९७ किलोमीटरचे रस्ते करण्यासाठी ६,००० कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. शहरातील 212 रस्ते, पूर्व उपनगरातील 181 रस्ते आणि पश्चिम उपनगरातील 516 रस्ते पक्के करण्यासाठी या कराराची तीन भागात विभागणी करण्यात आली होती.



हेही वाचा

मुंबई मेट्रोने सुरू केला अनलिमिटेड ट्रिप पास, मिळेल 15 ते 20 टक्के सूट

स्कूल बस असोसिएशन बस भाडे 15-20 टक्के वाढवणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा