Advertisement

मुंबई ते बदलापूर प्रवास होणार जलद

मुंबई ते बदलापूर प्रवास आता जलद होणार आहे.

मुंबई ते बदलापूर प्रवास होणार जलद
SHARES

मुंबई ते बदलापूर प्रवास आता जलद होणार आहे. कारण नवी मुंबईतील ऐरोली ते कल्याण कटाई नाका दरम्यान एमएमआरडीए एलिव्हेटेड रोड बांधणार आहे. या रोडमुळं मुंबई ते बदलापूर प्रवासाचं अंतर अर्ध्या तासानं कमी होणार आहे. तसंच, ऐरोली ते कल्याण हे अंतर फक्त ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

३० टक्के काम

या प्रकल्पाचं ३० टक्के काम पूर्ण झालं असून २०२१पर्यंत हा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४ ला जोडण्यासाठी मुंब्रा बायपास इथं १.७ किलोमीटरचा बोगदा तयार केला जात आहे. सध्या १०० मीटर बोगदा तयार झाला असून, बोगद्यासाठी पारसिकचा डोंगर फोडण्यात आला आहे. हा बोगदा २०२०पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.


२ तासांचा वेळ

मुंबईहून बदलापूरला जाण्यासाठी किमान २ तासांचा वेळ लागतो. त्यामुळं वाहतुककोंडी व प्रवासीवेळ जास्त लागत असल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. परंतु, या नव्या रस्त्यामुळं हे अंतर दीड तासात पार करता येणार आहे.



हेही वाचा -

महापालिका शाळा दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च

घरात गांजाची लागवड करणाऱ्याला अखेर अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा