Advertisement

गणेश विसर्जन: या मार्गाने करू नका प्रवास, नाहीतर अडकाल!


गणेश विसर्जन: या मार्गाने करू नका प्रवास, नाहीतर अडकाल!
SHARES

गणेश विसर्जनानिमित्तानं मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील ठिकठिकाणच्या मार्गांत बदल केले आहेत. त्यामुळं मंगळवारी वाहन घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या 'रूट मॅप'वर आवर्जून नजर टाका, नाहीतर उगाच कुठेतरी अडकाल.

यंदा ३,६०० वाहतूक पोलीस मुंबईभरातील मिरवणुकांसह वाहतुकीचं नियोजन करतील. त्यांच्या जोडीला ५०० ट्रॅफिक वॉर्डन देखील असतील. मंगळवारी मुंबईतील ५३ रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर ५४ रस्ते एकमार्गी करण्यात आले आहेत. त्याशिवाय ९९ ठिकाणी 'नो पार्किंग झोन' करण्यात आले आहेत.


येथे बघा 'रूट मॅप' -

#Traffic guidelines/diversions on Ganpati immersion routes today, for devotees heading towards South&Central Mumbai, Juhu & Versova Beach pic.twitter.com/gbhdRy09dk

— Mumbai Police (@MumbaiPolice) August 31, 2017


प्रमुख विसर्जन स्थळांवर अशी असेल व्यवस्था :

गिरगाव चौपाटी : मुंबईतील सगळ्यात मोठं विसर्जन स्थळ म्हणजे गिरगाव चौपाटी. येथे लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणीसह अनेक मनाच्या गणपतींचं विसर्जन केलं जातं. गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळा संपण्यास दुसरा दिवस उजाडतो. त्यामुळं येथील वाहतुकीचं नियोजन महत्त्वाचं ठरतं.

त्यानुसार यंदा जे. शंकरशेठ रोड, व्ही. पी. रोड, डॉ. भडकमकर मार्ग तसेच नाना चौकाच्या रस्त्यावरून सगळे मोठे गणपती गिरगाव चौपाटीच्या दिशेने जातील. डीजेच्या गाड्यांना ऑपेरा हाऊसच्या पुढे जाण्यास परवानगी नसेल.


येथे बघा 'रूट मॅप' -

#Traffic guidelines/diversions on Ganpati immersion routes today, for devotees heading towards Sheetal Talao, Powai Lake & Girgaun Chowpatty pic.twitter.com/cmZdjPKrLz

— Mumbai Police (@MumbaiPolice) August 31, 2017


दादर चौपाटी :
वरळी, माहीम आणि एन . सी केळकर मार्गावरून बाप्पा दादर चौपाटीवर येतील.

जुहू चौपाटी : सांताक्रूझवरून जुहू तारा रोडने तसेच विलेपार्लेवरून मिरवणुका जुहू चौपाटीवर येतील.

त्याशिवाय गोराई खाडी, पवई तलाव, वर्सोवा बीच, मालाड आणि मुलुंड येथे देखील विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.


Let's make his last day the best, with a hasslefree farewell till we see him again #VighnafreeMumbai #1DayToGo pic.twitter.com/TWUqFOt8mR

— Mumbai Police (@MumbaiPolice) September 4, 2017


लालबागच्या राजाचा मार्ग :
लालबागच्या राजासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे, यावेळी राजाला लाखों भाविकासहा मुंबई पोलीस आणि पॅरा मिलिट्रीच्या फोर्सच कडं असेल. सकाळी १० च्या सुमारास निघणारी राजाची मिरवणूक चौपाटीत दाखल होता होता पहाट उजाडते. लालबाग मार्केटमधून निघाल्यावर लालबागचा राजा भारत मातावरून साने गुरूजी मार्गावर येईल, क्लेअर रोडवरून राजा थेट नागपाड्यात येईल, तेथून दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग करत, सुतार गल्ली, माधव बाग, सीपी टँक, व्ही. पी. रोड करत ऑपेरा हाऊस वरून गिरगाव चौपाटीवर प्रवेश करेल.



हे देखील वाचा -

गणेश विसर्जनासाठी ४० हजारांचं पोलीस बळ तैनात



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा