Advertisement

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून सुरू होणार

सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटांत पार करता येईल.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून सुरू होणार
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षी नोव्हेंबरपासून सागरी मार्ग खुला केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, देशातील हा सर्वात लांब सागरी मार्ग हा खुल्या रोड टोलिंग पद्धतीचा देशातील पहिला मार्ग आहे.

सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटांत पार करता येईल.

मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा होईल.

शिवाय नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची बचत होईल. प्रदूषणविरहित असा हा प्रकल्प असून, काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची काळजी घेण्यात आली आहे. 

शिवडी ते न्हावा शेवादरम्यान अरबी समुद्रात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारल्या जात असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यावर १८० मीटर लांबीच्या सर्वात मोठ्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी केल्याने कामातील मोठा टप्पा पार पडला आहे.

पॅकेज एक : एल अँड टी (० ते १०.३८० किमी)पॅकेज दोन : डीएईडब्ल्यूओओई अँड सी - टाटा प्रकल्प जेव्ही (१०.३८० ते १८.१८७ किमी)पॅकेज तीन : एल अँड टी (१८.१८७ ते २१.८०० किमी)पॅकेज चार : इंटेलिंजट ट्रान्सपोर्ट सिस्टीमइंटरचेंज : मुंबईच्या बाजूने शिवडी आणि नवी मुंबईच्या बाजूने शिवाजी नगर व चिर्ले

सागरी सेतूमुळे मुंबई ते न्हावा शेवा अंतर २० मिनिटांत पार करता येईल. मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या पुलावरून दररोज किमान एक लाख वाहनांची ये-जा होईल, असा अंदाज आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा