Advertisement

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये 9 मार्च ते 11 मार्चपर्यंत पाणीकपात

9 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम करण्याचे बीएमसीने नियोजन केले आहे.

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये 9 मार्च ते 11 मार्चपर्यंत पाणीकपात
SHARES

पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईतील 11 वॉर्डात दोन दिवस 10 टक्के पाणीकपात होणार असल्याची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केली.

बीएमसीच्या म्हणण्यानुसार 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात लागू असेल.

ठाणे पश्चिमेतील कोपरी येथे ठाणे महापालिकेतर्फे नवीन पूल बांधण्यात येत आहे. या बांधकामादरम्यान, बीएमसीचा 2,345 मिमी व्यासाचा मुंबई-2 ट्रंक मेन खराब झाला आहे आणि पाणी गळत आहे.

9 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम करण्याचे बीएमसीने नियोजन केले आहे. त्यामुळे काही भाग आणि वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून १० टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

पूर्व उपनगरे आणि सिटीमधील खालील भागांना 10 टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागेल

पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम प्रभागांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. टी वॉर्ड, मुलुंड पूर्व आणि पश्चिम विभाग, एस वॉर्ड, भांडुप पूर्व, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व विभाग, एन वॉर्ड विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम विभाग आणि एल वॉर्ड कुर्ला पूर्व विभागातही पाणीकपात होणार आहे.

संपूर्ण B, E, F दक्षिण आणि F उत्तर प्रदेशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. तर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि ए वॉर्डमधील नेव्हल एरिया यांनाही पाणीकपाीचा  सामना करावा लागणार आहे.

पूर्व उपनगरे: एल

टी वॉर्ड: मुलुंड (पूर्व आणि पश्चिम) झोन

एस प्रभाग: भांडुप (पूर्व), नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) परिसर

एन प्रभाग: विक्रोळी (पूर्व), घाटकोपर (पूर्व आणि पश्चिम) सेक्टर

L प्रभाग: कुर्ला (पूर्व) क्षेत्र

एम/पश्चिम प्रभाग: संपूर्ण प्रभाग

एम/पूर्व प्रभाग : संपूर्ण प्रभाग

ए प्रभाग: बीपीटी आणि नौदल क्षेत्र

ब प्रभाग: संपूर्ण प्रभाग

ई प्रभाग: संपूर्ण प्रभाग

एफ/दक्षिण प्रभाग: संपूर्ण प्रभाग

एफ/उत्तर प्रभाग: संपूर्ण प्रभाग



हेही वाचा

विक्रोळीतील ट्राफिक समस्या सुटणार, 'हे' आहेत नवीन वाहतूक मार्ग

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा