Advertisement

मुंबईकरांना मिळणार आणखी ४४० दशलक्ष लिटर पाणी

गारगाई प्रकल्प वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे.

मुंबईकरांना मिळणार आणखी ४४० दशलक्ष लिटर पाणी
SHARES

मुंबई महापालिकेने पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील गारगाई नदीवर धरण प्रकल्प हाती घेतला आहे. या धरणामुळे बाधित होणारी सहा गावे स्थलांतरासाठी तयार झाली आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेसमोरील मोठा अडथळा दूर झाला असून हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. हे धरण पूर्ण झाल्यावर मुंबईला रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा  - मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नुकसानभरपाई नाही, खुुलासा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

गारगाई प्रकल्प वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. गारगाई धरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. धरणाचे आरेखन आणि प्रत्यक्ष कामासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. धरणासाठी पालिकेला २६ हेक्टर खासगी जमीन खरेदी करावी लागणार आहे.  जमिनीच्या भूसंपादनासाठी पालिकेने खास भूसंपादन कक्ष तयार केला आहे. 

हेही वाचा  - बापरे! मुंबईत रिक्षांची संख्या 'इतकी' वाढली

 गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरवण्यात येणार आहे.  या प्रकल्पामुळे सहा गावांतील ६१९ कुटुंबांचे पुनर्वसन जवळच असलेल्या देवळी गावात होणार आहे. गावकऱ्यांनी या गावात स्थलांतरित होण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईला पालिकेच्या मालकीच्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून रोज ३७५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. २०४१ पर्यंत पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लिटर इतकी होणार आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा