Advertisement

बापरे! मुंबईत रिक्षांची संख्या 'इतकी' वाढली

राज्यभरात मागील २ वर्षांत काळ्यापिवळ्या ऑटोरिक्षांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बापरे! मुंबईत रिक्षांची संख्या 'इतकी' वाढली
SHARES

राज्यभरात मागील २ वर्षांत काळ्यापिवळ्या ऑटोरिक्षांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात रिक्षा परवान्यावरील मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. निर्बंध उठण्यापूर्वी रिक्षांचे ५ लाख ११ हजार ९४१ असलेले परवाने मर्यादा शिथिल करताच ७ लाख ४५ हजार ८८ पर्यंत पोहोचले आहे. जवळपास २ लाख ३३ हजार १४७ नवीन परवान्यांची भर पडली आहे. यामध्ये मुंबईत रिक्षांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ आहे.


रिक्षांच्या संख्येवर मर्यादा

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयानं नोव्हेंबर १९९७ मध्ये मुंबईतील काळ्या-पिवळ्या रिक्षा, टॅक्सी, तसेच ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणावी असे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्य शासनानं ठरावीक मर्यादेबाहेर परवाने जारी होणार नाहीत अशी तजवीज केली. मर्यादा आणल्यानंतर परवान्यांचा काळाबाजार सुरू झाला.


परवाने खुले

जून २०१७ मध्ये नवे धोरण जारी करत परवाने खुले करण्यात आले. ज्यांना हवा त्याला परवाना देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी अटी शर्थी देखील शिथिल करण्यात आल्या होत्या. परवाने खुले नसल्यानं काळ्या-पिवळ्या रिक्षा आणि टॅक्सींची संख्या मर्यादित होती. मात्र, ते खुले केल्यावर त्यांची संख्या वाढेल आणि प्रवाशांची गैरसोय टळेल हा त्यामागील उद्देश होता.


परवान्याचा फायदा

जून २०१७ आधी रिक्षा परवानाधारकांची संख्या ५ लाख ११ हजार ९४१ एवढी होती. मात्र, हीच संख्या ७ लाख ४५ हजार ८८ पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. परवान्याचा फायदा बऱ्याच जणांनी घेतला आणि त्यामुळंच रिक्षांची संख्या वाढत गेली. टॅक्सी परवान्यांचीही संख्या ६९ हजार ६०९ एवढी होती. त्यातही वाढ होऊन २ वर्षांत ७४ हजार ३७५ पर्यंत पोहोचली आहे.


रिक्षा परवानाधारक

मुंबईत १ लाख ३० हजार ९७० रिक्षा परवानाधारक होते. त्यात ३४ टक्के भर पडली. सुमारे ४५ हजार ५०० नवीन परवान्यांचं वाटप झालं आहे. ठाणे, कल्याण, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद शहरांतही काळ्या-पिवळ्या रिक्षा परवान्यांचं वाटप चांगलंच झालं आहे. ठाण्यातही दोन वर्षांपूर्वी असलेले ४५ हजार ४२ रिक्षा परवान्यांची संख्या ६३ हजार ८३० पर्यंत गेली आहे.


मनमानी कारभार

१ एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत मुंबईत रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात विशेष मोहीम घेतली होती. भाडे नाकारणं, जादा भाडं घेणं, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं, प्रवाशांशी चांगली वागणूक नसणं, बॅज, अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि परवाना यासह अन्य कागदपत्रं जवळ न बाळगणं असे प्रकार चालकांकडून होत आहेत. त्यावेळी १० हजारपेक्षा जास्त चालक दोषी आढळले.



हेही वाचा -

केंद्रात तुमचंच सरकार, सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कुणी रोखलंय?

२२ किलो गांजासह ५ जणांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा