Advertisement

केंद्रात तुमचंच सरकार, सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कुणी रोखलंय?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीका करताना महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा भाजपचा प्रकार सुरू असल्याचं म्हटलं आहे.

केंद्रात तुमचंच सरकार, सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कुणी रोखलंय?
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीका करताना महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा भाजपचा प्रकार सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

हेही वाचा- छीन के लेंगे आझादी… मान्य आहे का? फडणवीसांनी विचारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात जो हिंसेचा भडका उडाला, त्याबाबत पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे शांततेचं आवाहन केलं आहे. या भडक्यामागे पाकिस्तानचे डोकं आणि हात असल्याचं जाहीर केलं. असं सांगणं ही मोदी सरकारची हतबलता असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवाय सावरकर मुद्द्यावरून विधीमंडळात गोंधळ घालणाऱ्या भाजप नेत्यांना उद्देशून देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून रण पेटलं असतानाच भाजपने वीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दाही काढला. वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. प्रश्न इतकाच आहे की, गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचं सरकार आहे. ‘भारतरत्न’ देऊन वीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखलं होतं? दुसरं असं की, सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारी ‘आयात’ मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचं तुम्ही काय करणार आहात?, असा प्रश्नही उपस्थित केला.

हेही वाचा- नागपूर हिवाळी अधिवेशात आमदार आले मुद्द्यांवरून गुद्द्यांवर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा