मुंबईत पाऊस 18 जूननंतरच

  Mumbai
  मुंबईत पाऊस 18 जूननंतरच
  मुंबई  -  

  आला... आला... म्हणताना दडी मारुन बसणाऱ्या पावसाची मुंबईकर चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, असा वेधशाळेने वर्तवलेला अंदाज फोल ठरलेला असताना हवामान खात्याने मुंबईत 18 जूननंतर पाऊस पडेल असा नवा अंदाज वर्तवला आहे.

  मंगळवारपर्यंत पाऊस गुजरातच्या वलसाडमध्ये दाखल झाला होता. पण, तो अद्याप मुंबईच्या दिशेने सरकलेला नाही. जून 17 किंवा 18 तारखेपर्यंत मुंबईत पाऊस बरसेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

  सद्यस्थितीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच नाशिक, परभणी, पुणे या भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागात अतिवृष्टी होईल म्हणून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

  येत्या 17 किंवा 18 तारखेपर्यंत पाऊस मुंबईत दाखल होईल. पण, तो सलग तीस दिवस किंवा रोज पडेल अशी शक्यता नाही. राज्यातील विविध भागांत पाऊस टप्प्याटप्प्याने दाखल झाला आहे. आतापर्यंत गुजरातच्या वलसाड भागात पाऊस दाखल झाला असून त्याला मुंबईत दाखल व्हायला अजून वेळ आहे. मुंबईत अधून-मधून सरी कोसळतील, अशी शक्यता आहे.
  - कृष्णानंद होसाळीकर, उपसंचालक, मुंबई वेधशाळा

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.