Advertisement

रेकॉर्ड ब्रेक थंडी, पारा ११ अंशांवर

यंदाच्या हंगामातील थंडीनं अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून, या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंदही करण्यात आली आहे.

रेकॉर्ड ब्रेक थंडी, पारा ११ अंशांवर
SHARES

दिल्लीत झालेली गारपीट, सातत्याने दिशा बदलणारे वारे आणि दोन दिवसांपासून उत्तरेकडून वाहणारे वाऱ्यांमुळे मुंबईच्या कमाल व किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा मुंबईचं तापमान ११ अंशांनी घटलं आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पाराही पहिल्यांदाच २४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यामुळं यंदाच्या हंगामातील थंडीनं अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून, या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंदही करण्यात आली आहे.



थंडीचा अनोखा अनुभव

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई परिसरात सकाळपासूनच गार वारे वाहू लागले. याचा परिणाम मुंबईतील कमाल तापमानावर होऊन शुक्रवारी सांताक्रुझ परिसरात पारा २४.२ अंशांपर्यंत खाली आला होता, तर शनिवारी पहाटे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. कुलाबा परिसरात १५.६ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून, कमाल तापमान २४.५ अंश सेल्सिअस होतं.



नॅशनल पार्क ७ अंशांवर

विशेष म्हणजे बोरीवली नॅशनल पार्क आणि आरे परिसरात पहाटे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वातावरणातील या बदलांमुळे मुंबईकरांनी दिवसभर थंडीच्या ऋतूचा अनोखा अनुभव घेतला. दरम्यान शनिवारपासून मुंबईत उष्ण वारे वाहणार असून, तापमान पुन्हा वाढणार आहे; परंतु १५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा पारा घसरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.



हेही वाचा -

Movie Review : पुलंची 'भाई'गिरी अन् शब्द-सूरांची मैफल

मुंबईत तापमानाची रस्सीखेच, पारा १२ अंशावर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा