Advertisement

ऑक्टोबर हिट! मुंबईत तापमानात वाढ

बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी शहरातील दिवसाचे तापमान ३५.१ अंश होते.

ऑक्टोबर हिट! मुंबईत तापमानात वाढ
SHARES

मंगळवार, ५ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० वाजल्यापासून मुंबईत विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य मुंबई आणि नवी मुंबईत मोठ्या सरी कोसळल्या. पण याचा परिणाम तापमानावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अहवालानुसार, बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी शहरातील दिवसाचे तापमान ३५.१ अंश होते. जे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याचा देखील रेकॉर्ड मोडत आहेत. १०, २८ आणि २९ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत कमाल तापमान ३५ अंश नोंदवले गेले.


तेजस ठाकरेंचं संशोधन, मुंबईतल्या विहिरीत आढळली अंध माशाची प्रजाती


गेल्या सलग चार दिवसांपासून मुंबईनं दिवसाच्या तापमानापेक्षा जास्त तापमान अनुभवले आहे. मंगळवारी कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) प्रवक्त्यानं सांगितलं की, पुढील आठवड्यात पारा ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा खाली येण्याची शक्यता नाही.

आयएमडीच्या सात दिवसांच्या अंदाजानुसार, शहरात कमीत कमी १२ ऑक्टोबरपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण असेल. तर अधूनमधून गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये उद्यानाची भिंत कोसळली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा