Advertisement

मुंबई विमानतळावर ब्लिंकिट सेवा सुरू

आता टर्मिनलमध्येच मिळणार त्वरित डिलिव्हरी

मुंबई विमानतळावर ब्लिंकिट सेवा सुरू
SHARES

Adani Airport Holdings Limited (AAHL) ने Blinkit सोबत भागीदारी करत Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) येथे देशातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या टर्मिनल 2 च्या डोमेस्टिक डिपार्चरमध्ये सुरू झाली आहे.

या सुविधेमुळे प्रवाशांना ब्लिंकिट (Blinkit) अॅपद्वारे आवश्यक वस्तू थेट एअरपोर्टमध्येच ऑर्डर करता येतील. बोर्डिंग गेट, लाउंज, फूड कोर्ट किंवा निवडक आउटलेट्सपर्यंत काही मिनिटांतच वस्तू पोहोचवल्या जातील. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत ही डिलिव्हरी केली जाणार असून, प्रवासात कोणताही अडथळा न येता सेवा दिली जाईल.

AAHL च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “डिजिटल सेवांच्या मदतीने प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आम्ही नवनवीन उपक्रम राबवत आहोत. या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि एअरपोर्टवरील सेवा अधिक आधुनिक आणि सोयीस्कर होईल.”

या सेवेत ट्रॅव्हल अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स, स्नॅक्स, पुस्तके, बेबी केअर आणि वैयक्तिक गरजेच्या वस्तू उपलब्ध असतील. तसेच, सुरक्षा नियमांनुसार परवानगी असलेले पाणी, कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूस हे एअरपोर्टमधील अधिकृत स्टोअर्समधूनच पुरवले जातील.

ब्लिकिंटसाठी (Blinkit) ही सेवा नव्या प्रकारच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी ठरणार आहे. तर AAHL साठी ही सुविधा प्रवाशांची सोय वाढवण्यासोबतच डिजिटल रिटेलमधून उत्पन्न वाढवण्याचा मार्ग ठरेल.

टर्मिनल 2 वरील मोठ्या प्रवासी संख्येचा विचार करता, ही सेवा प्रवासादरम्यान नेहमी भासणारी गरज पूर्ण करत असून, शेवटच्या क्षणी लागणाऱ्या वस्तू सहज उपलब्ध करून देणार आहे.



हेही वाचा

अंडरग्राउंड वॉकवे द्वारे वरळी, BKC आणि प्रमुख स्थानकांना जोडणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा