पेंग्विन भेटीचा मुहूर्त ठरला

 Byculla
पेंग्विन भेटीचा मुहूर्त ठरला

भायखळा - गेल्या अनेक दिवसांपासून पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकर प्रतिक्षा करत आहेत. मात्र आता मुंबईकरांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात 17 मार्चपासून पेंग्विन दर्शन नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पेंग्विन ठेवलेल्या कक्षाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे 31 मार्चपर्यंत पर्यटकांना मोफत पेंग्विन पाहता येणार आहेत. त्यानंतर पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढ-100 रुपये आणि मुलांसाठी 50 रुपये आकारले जातील. 1 एप्रिलपासून नवीन शुल्कदर लागू करण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी येणार्‍या सुमारे 6 ते7 हजार पर्यटकांसाठी 100 -100 ची बॅच तयार केली जाईल, अशी माहिती जिजामाता उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरदिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांना पेंग्विन पाहता येणार आहेत.

Loading Comments