Advertisement

एआरके डेकचं फ्लोटिंग रेस्टाॅरंट चार महिन्यानंतर पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत!

फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट बुडालं, त्याचं खूप मोठं नुकसान झालं. पण आता पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु येत्या चार महिन्यांनंतर हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विक्रांत चांदवडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

एआरके डेकचं फ्लोटिंग रेस्टाॅरंट चार महिन्यानंतर पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत!
SHARES

वांद्रे-वरळी सी लिंकजवळील एआरके डेकचं तरंगत हाॅटेल अर्थात फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट शुक्रवारी दुपारच्या दरम्यान अचानक समुद्रात बुडालं. पण आता चार महिन्यांनंतर हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्रूझ रेस्टाॅरंटच्या तीन मालकांपैकी एक विक्रांत चांदवडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


चार महिन्यांसाठी राहणार होतं बंद
काही महिन्यांपूर्वीच एआरके डेक फ्लोटिंग रेस्टाॅरंट सुरू करण्यात आलं होतं. अलिशान असं तीन मजली हे क्रूझ रेस्टाॅरंट वांद्रे-वरळी सी लिंकजवळ होतं आणि हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट अल्पावधीतच मुंबईकरांच्या पसंतीस पडलं होतं. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नियमानुसार २५ मे पासून पुढचे चार महिने अर्थात पावसाळा संपेपर्यंत फ्लोटींग क्रूझ रेस्टाॅरंट बंद ठेवावं लागतं. त्यानुसार २५ मे पासूनच हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट ग्राहकांसाठी बंद करण्यात आलं होतं.


भाऊचा धक्का इथं क्रुझ नेताना घडली दुर्घटना
चार महिन्यांसाठी फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट बंद राहणार असल्यानं क्रूझ भाऊचा धक्का इथं हालवण्यात येणार होतं. त्यानुसार हीच तयारी सुरू असताना शुक्रवारी दुपारी अचानक वादळ आणि भरती आली आणि जेट्टीला लावलेला अँकर निसटला. त्यामुळं क्रूझ दगडाला आपटली आणि क्रूझचा खालचा भाग फुटून त्यातून पाणी क्रूझमध्ये गेलं नि क्रुझ बुडाली. फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट बंद झाल्यानं त्यावेळी त्यात केवळ १३ कामगार होते नि त्यांना त्वरीत बाहेर काढण्यात सागरी पोलिस, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला यश आल्यानं कोणतीही जिवितहानी झाली आहे.

पुन्हा सेवेत!
फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट बुडालं, त्याचं खूप मोठं नुकसान झालं. पण आता पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर चांदवडकर यांनी दिलं आहे. सध्या बुडालेली क्रूझचं दुरूस्त करत त्याला नवं रूप देता फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट पुन्हा सुरू करता येईल का यादृष्टीनं प्रयत्न करण्यात येतील. जर हे शक्य झालं नाही तर नव्यानं नवं फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट आणण्यात येईल, पण नवं फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट त्याच ठिकाणी चार महिन्यांनंतर मुंबईकरांना पाहायला मिळेल, त्यात बसून समुद्राचा नजारा बघत जेवणाचा आस्वाद घेता घेता येईल, असा दावा चांदवडकर यांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा