Advertisement

IAS Transfer: नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली

नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर महापालिकेला मिळाले नवे आयुक्त.

IAS Transfer:  नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली
SHARES

राज्यातील नवी मुंबई, उल्हासनगर आणि मिरा-भाईंदर अशाी तीन महापालिका आयुक्तांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यात असक्षम ठरल्याने या महापालिकाआयुक्तांची बदली करण्यात आल्याची चर्चा देखील रंगली आहे.

या तीन महापालिकांपैकी नवी मुंबई महापालिका परिसरात सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९२३ एवढी आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १०४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मिरा-भाईंदरमध्ये काेरोनाबाधित रुग्णांची संख्या २५१० वर जाऊन पोहोचली आहे.

हेही वाचा - मुंबईत पालिकेच्या मालकीच्या इमारतीच धोकादायक

आयएएस अधिकारी अभिजीत बांगर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ते अण्णासाहेब मिसाळ यांची जागा घेतील. तुकाराम मुंढे यांच्या आधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेले अभिजीत बांगर यांची ४ महिन्यात दुसऱ्यांदा बदली झाली आहे.

राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ते आयएएस अधिकारी समीर उन्हाळे यांची जागा घेतील, तर विजय राठोड यांची मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. ते चंद्रकांत डांगे यांची जागा घेतील. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या कामाचा आढावा घेऊनच केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

याआधी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरुन उचलबांगडी करत त्यांच्या जागी राज्य सरकारने इक्बाल चहल यांची नेमणूक केली होती.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांचा ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा