Advertisement

मुंबईत पालिकेच्या मालकीच्या इमारतीच धोकादायक

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महापालिकेकडून मुंबई शहर व उपनगरातील सर्व खाजगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचं सर्वेक्षण केलं जातं.

मुंबईत पालिकेच्या मालकीच्या इमारतीच धोकादायक
SHARES

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महापालिकेकडून मुंबई शहर व उपनगरातील सर्व खाजगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचं सर्वेक्षण केलं जातं. सर्वेक्षणानंतर मुंबईतील अत्यंत धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणं आवश्यक आहे अशा इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या जातात. यंदा केलेल्या सर्वेक्षणात ४४३ इमारती धोकादायक असल्याचं आढळून आलं आहे. धक्कादायक म्हणजे घाटकोपरमध्ये पालिकेच्या मालकीच्याच ५६ इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबईत दोन वर्षांपूर्वी ६१९ अतिधोकादायक इमारती  होत्या. गेल्यावर्षी ही संख्या ४९९ झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींचा आकडा कमी झाला आहे. यंदा मुंबईत ४४३ धोकादायक इमारती आहेत. पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते.

धोकादायक इमारतींच्या यादीत ए विभागातील बेस्टच्या मालकीची मेहेर मेन्शन, ताडदेव येथील गंगा जमुना चित्रपटगृह, लालबागचे गणेश टॉकीज, सायन येथील पंजाबी कॉलनीतील सर्व २५ इमारती अशा इमारतींचा गेल्या अनेक वर्षांपासून समावेश आहे. भायखळा, डोंगरी, गिरगाव या भागात सर्वात जुन्या इमारती असल्या तरी त्या उपकर इमारती असल्यामुळे पालिकेच्या यादीत या भागातील खासगी धोकादायक इमारतींची संख्या सर्वात कमी आहे.


अतिधोकादायक इमारती

एन विभाग (घाटकोपर) – ५२,  

एच/वेस्ट (वांद्रे पश्चिम) – ५१

टी (मुलुंड) - ४९,  

के/पश्चिम (अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम)  - ३७

के/पूर्व  (अंधेरी व जोगेश्वरी पूर्व) - ३१,

पी/उत्तर (मालाड) - २८

एच/इस्ट  (वांद्रे पूर्व) - २७



हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा