Advertisement

कंगना विरोधात पालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलाचे मानधन ८२ लाख

शरद यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार;तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये, असे एकूण ८२ लाख ५० हजार दिले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले

कंगना विरोधात पालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलाचे मानधन ८२ लाख
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणावतने उडीने घेतल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या, या काळात कंगनाने महाराष्ट्र सरकार वारंवार टिका केली. त्याच वेळी पालिकेने कंगनाच्या बंगल्यातील अवैध बांधकामावर कारवाई केल्याने वातावरण चांगलेच तापले. या कारवाई विरोधात कंगनाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर पालिकेकडून बाजू मांडण्यासाठी अॅड अस्पी चिनाॅय या वकिलाला मानधनापोटी आतापर्यंत तब्बल ८२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.

हेही वाचाः- कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

कंगनाच्या पाली हिल, वांद्रे येथील आॅफिसचा काही भाग अनधिकृत ठरवून तो ९ सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेकडून तोडण्यात येत असतानाच कंगनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. महापालिकेने विशिष्ट कुहेतूने बंगल्यातील बांधकाम तोडल्याचा आरोप करत या तोडकामाला स्थगिती देण्याची मागणी कंगनाने वकील रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत केली होती. त्यानंतर न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने तातडीची सुनावणी घेत कंगनाने केलेल्या आरोपांची दखल घेतली. विशेषत: ती घरी नसताना आणि नोटिशीला २४ तास उलटल्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. शिवाय महापालिकेची कारवाई प्रथमदर्शनी कुहेतूने केल्याचं दिसत असल्याचं निरीक्षण नोंदवत महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. मुंबई महापालिकेच्या कारवाईदरम्यान कार्यालयातील दुर्मिळ सामान, वस्तूंचं नुकसान झाल्याचा आरोप करत कंगनाने महापालिकेकडून २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील मागितली होती.

हेही वाचाः- मुंबईतल्या गॅस गळतीचा शोध लावण्यासाठी पालिकेनं पाठवला मसुदा


या प्रकरणी आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी पालिकेने अँड अस्पी चिनाॅय यांची निवड केली. कंगनाप्रकरणी पालिकेने न्यायालयात नेमलेल्या वकिलाला आतापर्यंत किती मानधन देण्यात आले, याची माहिती शरद यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार;तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये, असे एकूण ८२ लाख ५० हजार दिले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा