Advertisement

पालिकेच्या पाच नामनिर्देशित नगरसेवकांची घोषणा


पालिकेच्या पाच नामनिर्देशित नगरसेवकांची घोषणा
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या पाच नामनिर्देशित सदस्यांची नावे महापालिका सभागृहात घोषित करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या वतीने माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले, भाजपाचे त्रिपाठी, गणेश खणकर आणि काँग्रेसचे सुनील नरसाळे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नावे जाहीर केली.

मुंबई महापालिकेच्या 227 नगरसेवकांसह पाच नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक केली जाते. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेचे दोन, भाजपाचे दोन आणि काँग्रेसचा एक अशाप्रकारे नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाणार होती. त्यामुळे शिवसेनेने आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे गोपनीय पद्धतीने महापालिका आयुक्त आणि चिटणीस यांना सादर केली होती. परंतु भाजपाच्या दोन सदस्यांची नावेही मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून जाहीर करून गोपनीयतेचाच भंग केला. परंतु याबाबत महापालिका सभागृहात कोणत्याही प्रकारची हरकत घेण्यात आली नाही.

भाजपाचे त्रिपाठी आणि गणेश खणकर हे जिल्हाध्यक्ष असून काँग्रेसचे सुनील नरसाळे हे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत. तृष्णा विश्वासराव या नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यांचे पुनर्वसन शिवसेनेने करून पुन्हा त्यांना सभागृहात येण्याची संधी दिली आहे. तर अरविंद भोसले हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. महापौरांनी या पाचही सदस्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अरविंद भोसले हे झाडांची रोपे घेऊन सभागृहात शिरले. त्यामुळे पहिल्याच दिवशी भोसले यांनी गैरवर्तन करत आपली चुणूक दाखवली आहे. अखेर त्यांच्या हातातील रोपे बाहेर ठेवायला लावून त्यांना सभागृहात बसायला सांगण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा