Advertisement

के. ई. एमच्या 'त्या' वॉर्डला अरुणा शानबाग यांचे नाव नाहीच


के. ई. एमच्या 'त्या' वॉर्डला अरुणा शानबाग यांचे नाव नाहीच
SHARES

केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक चारला विशेष बाब म्हणून अरुणा शानबाग यांचे नाव देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे. वॉर्ड क्रमांक चारला 'अरुणा शानबाग कक्ष' असे नाव देता येणार नसल्याचे महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

अरुणा शानबाग या के. ई. एम रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. मात्र रूग्णालयातल्याच एका वॉर्डबॉयने त्यांच्यावर शारिरीक अत्याचार केले. या जबर धक्क्यामुळे त्या कोमात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबाग यांचे पालकत्व के. ई. एम. रुग्णालयाला दिल्यामुळे तेथील नर्स, डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी अतिशय आत्मीयतेने त्यांची देखभाल करत होते. 42 वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांचे 18 मे 2015 रोजी निधन झाले. त्यामुळे अरुणा शानबाग यांची स्मृती चिरंतन राहावी यासाठी के. ई. एम. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक चारला एक विशेष बाब म्हणून 'अरुणा शानबाग कक्ष' असे नाव देण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केलेल्या मागणीनुसार हा ठराव करण्यात आला होता. मात्र यावर प्रशासनाने अभिप्राय देत या वॉर्डला शानबाग यांचे नाव देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अरुणा शानबाग यांचे नाव देता येत नसले तरी त्यांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नर्सेस होम येथे विद्यार्थी परिचारिका आणि परिचारिकांकरता ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रंथालयासाठी नवीन पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. विद्यार्थी, परिचारिकांसाठी जिमही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री खरेदी करण्यात आलेली आहेत.

- डॉ. अविनाश सुपे, संचालक, महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा