Advertisement

नवी मुंबईत अतिरिक्त पाणीकपात केली जाणार नाही

मोरबे धरण भरण्यासाठी ४५०० मिमी पावसाची गरज असल्याची माहिती नवी मुंबई आयुक्तांनी दिली

नवी मुंबईत अतिरिक्त पाणीकपात केली जाणार नाही
SHARES

नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या क्षेत्रापेक्षा जास्त पाऊस शहरात होत आहे. गेल्या वर्षीही मोरबे धरण भरले नव्हते. शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरण्यासाठी यंदा ४५०० मिमी पावसाची गरज आहे. तसेच, शहरातील सध्याची पाणीकपात सुरूच राहणार असली तरी अतिरिक्त पाणीकपात होणार नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे, असे लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

नवी मुंबई शहरातील धरणाच्या पाणीपातळीत घट झाल्याने आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांनुसार २८ एप्रिलपासून पाणीकपात सुरू करण्यात आली. आठवड्यातून एक दिवस विभागनिहाय सायंकाळी पाणीपुरवठा होत नाही. 

दुसरीकडे मुंबई शहरात पावसाला सुरुवात झाली असली तरी पाण्याबाबत खबरदारी म्हणून येत्या शनिवारपासून पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पाणीकपात तातडीने रद्द न करता येत्या पावसावर पाणीकपात थांबवायची की नाही, याचा निर्णयही नवी मुंबई महापालिका घेणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात नवी मुंबईत चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा असली तरी मोरबे धरण परिसरात नवी मुंबईतील पावसाच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.

नवी मुंबई शहरात आतापर्यंत 461.97 मिमी पाऊस झाला असून मोरबे धरण परिसरात 357.80 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात जास्त आणि धरणात कमी पाऊस पडत आहे. पावसाला नुकतीच सुरुवात झाली असली तरी पाऊस उशिराने सुरू झाल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही धरण भरणार की नाही, ही चिंता महापालिका प्रशासनाला आहे. आतापासूनच पाणी बचत आणि पाणीपुरवठ्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेण्यात येत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरण ढगाळ झाले असून, मोरबे परिसरातही चांगला पाऊस झाला आहे. गेली २ वर्षे धरण भरले नव्हते, त्यापूर्वी सलग ३ वर्षे मोरबे धरण भरले होते.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा