Advertisement

विमानतळ नामकरण वाद : १६ ऑगस्टपासून काम बंद पाडण्याचा आंदोलकांचा इशारा

दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून शुक्रवारी (२४ जून) सिडकोला १ लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात आलं.

विमानतळ नामकरण वाद : १६ ऑगस्टपासून काम बंद पाडण्याचा आंदोलकांचा  इशारा
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) नामकरणाचा वाद आता चांगलाच चिघळला   आहे. या विमानतळाला राज्य सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नवी मुंबईतील स्थानिक दि. बा. पाटील (d.b.patil) यांच्या नावावर ठाम आहेत. 

दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून शुक्रवारी (२४ जून) सिडकोला १ लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात आलं. १५ ऑगस्टपर्यंत या विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव नाही मिळालं तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू अशा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

आंदोलन असल्याने सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. याशिवाय वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनांचे मार्गदेखील बदलण्यात आले होते. या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशा विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले.  यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनाकडे जात निवेदन दिलं. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर दि. बा. पाटील यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे किंवा दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जावं हा संघर्ष आता सुरु झाला आहे. दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जावं असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली आहे.



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा