Advertisement

नवी मुंबई : सिडकोकडून 15 टक्के पाणीकपात जाहीर

सिडको हेटवणे धरणातून गावांना पाणीपुरवठा करते.

नवी मुंबई : सिडकोकडून 15 टक्के पाणीकपात जाहीर
SHARES

अपुरा पाऊस आणि धरण क्षेत्रात पाणीसाठा उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर सिडकोने सिडकोच्या अखत्यारीतील गावांतील रहिवाशांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या धरणांमध्ये केवळ तीन महिन्यांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सिडकोने २८ जून २०२३ पासून पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको सिडकोचे हेटवणे धरण, NMMC चे मोरबे धरण, MIDC चे बारवी धरण आणि MJP चे पाताळगंगा धरण अशा विविध स्त्रोतांद्वारे पाणी पुरवठा करते. मात्र वरील धरण क्षेत्रात अद्यापही अपुरा पाऊस आणि नवीन जलस्रोत उपलब्ध नसल्याने या सर्व प्राधिकरणांनी पाणीकपातही जाहीर केली आहे.

अपुऱ्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आगामी दिवसांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाणी जपून व काटकसरीने वापरून सिडकोला सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा