Advertisement

भटक्या श्वानांना खायला दिले म्हणून ८ लाखांचा दंड

नवी मुंबईतील एका रहिवासी कॉम्प्लेक्सनं सोसायटीत राहणाऱ्या महिलेला सुमारे ८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भटक्या श्वानांना खायला दिले म्हणून ८ लाखांचा दंड
SHARES

नवी मुंबईतील एका रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या महिलेला सुमारे ८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीनं कॅम्पसमध्ये भटक्या श्वानांना खायला दिल्यामुळे ही कारवाई केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. सोसायटीविरोधात अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाकडे तक्रार करण्यात आली आहे.

अंशू सिंह नावाची ही महिला नवी मुंबईतील सी-वुड इस्टेटच्या एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये राहते. या कॉम्प्लेक्समध्ये ४०हून अधिक इमारती आहेत. अंशू परिसरातील भटक्या श्वानांना खायला देते.

अंशू सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कॅम्पसमध्ये भटक्या श्वानांना खायला दिल्यामुळे त्यांना जुलैपासून दररोज ५००० रुपये दंड आकारण्यात येत आहे. ही रक्कम सुमारे ८ लाखांवर आली आहे. त्या म्हणाल्या की, मी फक्त मुक्या प्राण्यांना जेवण दिलं होतं. सोसायटीनं माझ्यावर घाण पसरवल्याचा आरोप केला.

अंशू सिंह यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी सोसायटीतील अन्य एका रहिवाशावर ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

रेसिडेंशियल कॉम्प्लेक्सच्या सेक्रेटरी विनीता श्रीनंदन यांनी सांगितलं की, ट्यूशनला जाताना मुले भटक्या श्वानांच्या मागे धावतात. तसंच श्वानांच्या भीतीमुळे वृद्ध लोक कुठेही फिरू शकत नाहीत. आम्ही भटक्या श्वानांसाठी शेड बांधले आहे. परंतु काही सदस्य अजूनही या प्राण्यांना उघड्यावर खायला देतात. त्यामुळे आम्ही दंडाची तरतूद केली आहे. आम्ही जी काही कारवाई केली आहे ती सोसायटीच्या नियमानुसार आहे.

सोसायटीत राहणाऱ्या लीला शर्मा या आणखी एका महिलेनं आरोप केला की, मला श्वानांना खायला दिल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मी ६० वर्षांची आहे. मी कुत्र्यांना खायला आणि त्यांची काळजी घेण्यासाठी दररोज खाली जातो. यात काय चुकीचे आहे?

श्वानप्रेमींच्या मदतीसाठी पुढे आलेल्या अ‍ॅडव्होकेट सिद्ध विद्या म्हणाल्या की, भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या परिसरात राहणारा कोणताही प्राणी दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. जनावरांना खायला दिल्यामुळे लोकांना दंड करणे कायद्याच्या विरोधात आहे.



हेही वाचा

मॉलसह उपाहारगृहांमध्ये 'लसीकरण प्रमाणपत्र दाखवा आणि प्रवेश करा' नियम लागू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा