Advertisement

बेलापूरमध्ये पहिले बहुमजली पार्किंग लवकरच सुरू होणार

बहुमजली पार्किंगमध्ये 476 चारचाकी आणि 121 दुचाकी बसू शकतील एवढी जागा आहे.

बेलापूरमध्ये पहिले बहुमजली पार्किंग लवकरच सुरू होणार
SHARES

बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे (NMMC) पहिले बहुमजली पार्किंग लॉट लवकरच कार्यान्वित होणार आहे. पार्किंग लॉटचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बहुमजली पार्किंगमध्ये 476 चारचाकी आणि 121 दुचाकी बसू शकतील एवढी जागा आहे.

बेलापूरमधील सेक्टर 15 येथे पार्किंग लॉट बांधण्यात येत आहे जो की पाम बीच रोड, बेलापूर न्यायालयाजवळ आणि जलवाहतुकीसाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या जेट्टीच्या जवळ आहे. 

याव्यतिरिक्त, अनेक पायाभूत सुविधा असलेल्या प्रकल्पांजवळ हा पार्किंग लॉट आहे. मात्र, डेडिकेटेड पार्किंग लॉटअभावी लोक रस्त्याच्या कडेला पार्किंग करताना दिसतात. रस्त्यावरील पार्किंगची समस्या सो़वण्यासाठी, प्रशासकीय संस्थेने 2018 मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला.

प्रशासकीय  संस्था पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारत आहे. “शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने आणि पुरेशा चार्जिंग स्टेशनची गरज भासू लागली आहे. पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स मदत करतील,” असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने फ्री प्रेसला सांगितले.



हेही वाचा

अंधेरीत पाईपलाईन फुटली, 'या' भागातील पाणीपुरवठा खंडित

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील स्विमिंग पूल ५ सप्टेंबरपासून खुले होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा