Advertisement

नवी मुंबईत ८ ऑगस्टला पाणीपुरवठा बंद, तर दुसऱ्या दिवशी...

खारघर आणि कामोठेसह नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवथा खंडित असेल.

नवी मुंबईत ८ ऑगस्टला पाणीपुरवठा बंद, तर दुसऱ्या दिवशी...
SHARES

खारघर आणि कामोठेसह नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. कारण NMMC मोरबे धरण ते दिघा वॉर्डातील मुख्य पाईपलाईनच्या देखभालीसाठी 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येत आहे.

NMMC च्या पाणी पुरवठा विभागानुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

मात्र, बुधवारी सकाळी ९ ऑगस्टपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. या कालावधीत कामोठे आणि खारघर क्षेत्रातील नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.



हेही वाचा

मुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन महागणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा