तळोजा भुयारी मार्ग नवी मुंबईतील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या भुयारी मार्गात पाणी साठलं आहे. त्यामुळे तिथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा भुयारी मार्ग तयार करून अवघे दहा दिवसच झाले आहेत.
अहवालानुसार, रेल्वेनं खाडीच्या पाण्याचा पूर थांबवण्यासाठी या भुयारी मार्गाची दुरुस्ती केली. यासाठी २८ कोटी रुपये खर्च आला. पण नागरिकांनुसार भुयारी मार्गात पाणी भरण्याचं कारण म्हणजे चुकिची रचना. पण रेल्वेनं नागरिकांचा हा अंदाज मान्य केला नाही. त्यांच्यानुसार रचनेत किंवा पंपिंग क्षमतेत काही चुकलं नाही.
९ नोव्हेंबरला हा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला होता, मात्र प्रवाशांनी लवकरच पाणी भरत असल्याची तक्रार केली.
दुसरीकडे, नवी मुंबई महानगरपालिका (NMSC) सार्वजनिक ठिकाणी शौच करणाऱ्या किंवा खुल्या भागात कचरा टाकणार्या लोकांवर कठोर कारवाई करणार आहे. प्रशासकिय संस्थेकडून नजर ठेवण्यासाठी पथके तैनात करण्याची ताकीद देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील रहिवाशांविरोधात झोपडपट्टीच्या भागात खुल्या ठिकाणी शौचास झाणे आणि खुल्यावर सर्रास कचरा टाकत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. याव्यतिरिक्त, एनएमएमसी झोपडपट्टी भागात, रेल्वे रुळांजवळच्या भागात, मोकळ्या जागांवर आणि कचरा विल्हेवाट लावणार्या जागेतील खारफुटीच्या पट्ट्यांकडे लक्ष देणार आहे.
हेही वाचा