Advertisement

केईएम, नायरमध्ये लवकरच कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू

नायर रुग्णालयामध्ये १४८ जणांना लसीचा पहिला डोसतर ९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.

केईएम, नायरमध्ये लवकरच कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू
SHARES

केईएम, नायर रुग्णालयात लवकरच कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात होणार आहे.  दोन्ही रुग्णालयांमध्ये लस चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा लवकरच संपणार असून त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत

नायर रुग्णालयामध्ये १४८ जणांना लसीचा पहिला डोस तर ९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. आयसीएमआरने पहिल्या टप्प्यात १०० जणांना लस टोचण्यास संमती दिली होती. त्यानंतर अतिरिक्त ४८ जणांना ही लस देण्यात आली आहे.  

केईएम रुग्णालयामध्ये लस चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. येथे शंभर जणांना लस देण्यात आली असून इतर ९५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.

दरम्यान, लोकमान्य टिळक रुग्णालयास कोरोना चाचण्यांसाठी नैतिक समितीच्या (एथिकल कमिटीची) मान्यतेची प्रतीक्षा आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयातील संबधित विभागातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या चाचणीसाठी रुग्णालयामध्ये एक हजार स्वयंसेवकांची नोंदणी केलेली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांचाही यामध्ये समावेश असेल. 

लस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर पुढील वर्षभर लक्ष ठेवण्यात येईल. या चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यांकडून विचारणा होत आहे. नैतिक समितीकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. या संदर्भातील प्रस्ताव रुग्णालयाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिला आहे. 



हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा