Advertisement

एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक

एपीएमसी मार्केट हे मुंबई व आसपासच्या इतर शहरांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे घाऊक मार्केट असून ते बंद करणे शक्य नाही. त्यामुळे त्या ठिकाणी संख्या मर्यादेचं तसंच कोव्हीड सुरक्षा नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक
SHARES

वाशी येथील एपीएमसी मार्केट हे कोरोना वाढीचं नवी मुंबईतील केंद्र बनलं आहे. त्यामुळे त्यामुळे कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना एपीएमसीमधील पाचही मार्केटकडं पालिकेकडं विशेष लक्ष दिलं जात आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तुर्भे विभागाचे नोडल अधिकारी उप आयुक्त  राजेश कानडे आणि तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त  सुबोध ठाणेकर यांना एपीएमसी मार्केटमधील संख्या नियंत्रण आणि त्या ठिकाणचे कोव्हीड टेस्टींग याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिलेले आहेत. 

येत्या सोमवारपासून म्हणजे २६ एप्रिलपासून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवूनच मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये होणारी गर्दी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तेथील गाड्यांची आवक मर्यादित ठेवण्यासाठी नियोजन करणे व तशा प्रकारचे निर्देश व्यापारी व माल पुरवठा करणारे पुरवठादार यांना देणे तसंच कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवूनच मार्केटमध्ये प्रवेश दिला जावा, अशा  सूचना एपीएमसी प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.  याची योग्य अंमलबजावणी करण्याकडे महानगरपालिका आणि पोलीस यांच्यामार्फत लक्ष ठेवलं जाणार आहे.

एपीएमसी मार्केट हे मुंबई व आसपासच्या इतर शहरांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे घाऊक मार्केट असून ते बंद करणे शक्य नाही. त्यामुळे त्या ठिकाणी संख्या मर्यादेचं तसंच कोव्हीड सुरक्षा नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे याची कल्पना देत घाऊक विक्री सुरू ठेवून किरकोळ विक्री पूर्णपणे बंद कऱण्यात यावी, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.

 नवी मुंबई महानगरपालिकेने सुरवातीपासूनच कांदा बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला व दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये कोरोना चाचणी सेंटर कार्यान्वित केली आहे. त्याठिकाणी दररोज १५०० हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय मार्केटमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती / दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये ५ व्यक्तींची ५ विशेष दक्षता पथके म्हणजे १५ विशेष दक्षता पथके एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत आहेत.



हेही वाचा 

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा